Stock Market: “येस बँके’च्या शेअर्सची किंमत उच्चांक पातळीवर
Updated On:

मुंबई – येस बॅंकेचा भांडवली पाया बळकट असल्यामुळे या वर्षात बॅंकेचा कर्जपुरवठा आणि ठेवी वाढण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बॅंकेच्या शेअरचा भाव गुरूवारी 11 टक्क्यांनी वाढून 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर गेला.
केअर रेटिंग या संस्थेने येस बॅंकेचे पतमानांकन उच्च पातळीवर नेऊन ठेवले असल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी या बॅंकेच्या शेअरची खरेदी केली असल्याचे दिसून आले. एक एप्रिलपासून या बॅंकेच्या शेअरची जोरदार खरेदी होत असल्यामुळे शेअरचा भाव 33 टक्क्यांनी वाढला आहे.
या बॅंकेने शेअर बाजारांना कळविल्या माहितीत म्हटले आहे की बॅंकेचा कर्जपुरवठा 8.8 टक्क्यांनी वाढून 1,81,508 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी बॅंकेने 1,66,893 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला होता.




