आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजार कमजोर; सेन्सेक्सची घसरणीसह सुरूवात

Stock Market | देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीसह सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र काही वेळातच बाजारात किंचितशी वाढही झाल्याचे पाहायला मिळाले. बीएसईचा सेन्सेक्स 96.41 अंकांनी किंवा 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 79,552 वर उघडला तर NSE चा निफ्टी 24,342.35 वर होता. बीएसई सेन्सेक्सने किंचित घसरणीसह सुरुवात केली तर निफ्टीमध्ये किंचित तेजी दिसून आली.
व्यवहार होत असलेल्या निफ्टी शेअर्सपैकी 1513 शेअर्समध्ये वाढ तर 501 शेअर्समध्ये घट होत आहे. शेअर बाजारात अदानी समूहाचे सर्व 10 शेअर्स आज वाढत आहेत आणि एकही शेअर घसरत नाही. अदानी एनर्जी 4 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. एमएससीआयवरील निर्बंध उठवल्यामुळे अदानीचे शेअर्स वधारले आहेत. अदानी एनर्जी 5टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
कोणत्या शेअर्समध्ये तेजी? Stock Market |
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, भारती एअरटेल, सन फार्मा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ॲक्सिस बँक यांचे शेअर्स नफ्यासह व्यवहार करत आहेत.
बाजार उघडण्याच्या काही वेळातच NSE चा निफ्टी केवळ 35 अंकांनी घसरला आणि 24311 वर आहे. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 26 शेअर्स तेजीत आहेत तर 23 शेअर्स घसरत आहेत. दरम्यान, सोमवारी BSE सेन्सेक्स 375.79 अंक किंवा 0.47 टक्क्यांच्या घसरणीसह 79,330.12 वर उघडला होता. NSE चा निफ्टी 47.45 अंकांनी किंवा 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 24,320.05 वर उघडला. बाजार उघडताच, सुरुवातीच्या काही मिनिटांत अदानी शेअर्समध्ये 2 ते 2.5 टक्क्यांची कमजोरी दिसून आली होती. मात्र आजचे चित्र वेगळे पाहायला मिळत आहे
हेही वाचा:
Haryana : गॅस सिलिंडर फक्त 500 रुपयांत; ‘हर घर हर गृहिणी योजना’ पोर्टल लॉन्च




