Stock Market Updates: इंडिगोचा शेअर 2 टक्क्यांनी घसरला

मुंबई – गेल्या आठवड्यात भारतातील सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगो कंपनीचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सोमवारी इंडिगोची पालक कंपनी असलेल्या इंटर ग्लोब एव्हीएशन या कंपनीच्या शेअरच्या भावात दोन टक्क्यांनी घट झाली.
सकाळी या कंपनीच्या शेअरचा भाव बराच घसरला होता. मात्र नंतर काही प्रमाणात खरेदी झाल्यामुळे शेअरच्या भावामध्ये थोडीफार सुधारणा झाल्याचे दिसून आले. गंगवाल यांनी इतर क्षेत्रात काम करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. त्यांचे या कंपनीमध्ये 37 टक्के भांडवल आहे.
ते पुढील पाच वर्षांमध हळूहळू कमी करण्याचा मनोदय गंगवाल यांनी जाहीर केला. सध्या भारतामध्ये नागरी विमान वाहतूक क्षेत्रांमध्ये मोठी स्पर्धा आहे. एअर इंडिया नव्या स्वरूपात कार्यरत झाली आहे. त्याचबरोबर राकेश झुनझुनवाला यांची आकासा कंपनी लवकरच कामकाज सुरू करणार आहे.





