Stock Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही तेजी

मुंबई – शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रातही एचडीएफसी ट्विन्स आणि परकीय गुंतवणूकदारांकडून झालेल्या खरेदीमुळे तेजी कायम राहिली. तसेच रुपयाही वधारल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 390 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 112 अंकांची वाढ झाली.
सेन्सेक्समध्ये आज 0.64 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,045 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.62 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,165 वर पोहोचला. शेअर बाजार बंद होताना मेटल आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये आज मोठी खरेदी झाल्याचे दिसून आले. मेटल इंडेक्समध्ये आज 2.4 टक्के, तर कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 1.4 टक्क्यांची वाढ झाली.
बाजार बंद होताना आज टाटा स्टीलच्या सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2.72 टक्क्यांनी वाढ झाली. त्यापाठोपाठ लार्सन अँड टुब्रो, विप्रो, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, भारती एअरटेल, एनटीपीसी आणि आयटीसी यांच्यातही तेजी कायम राहिली. यात एचडीएफसी ट्विन्सचा नफ्यापैकी निम्मा वाटा आहे.याउलट टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बॅंक, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीज 1.65 टक्क्यांपर्यंत घसरले.
बॅंक आणि फार्मा इंडेक्समध्येही आज प्रत्येकी 0.5 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे सार्वजिनक बॅंकांच्या निफ्टीमध्ये आज 1.2 टक्क्यांची घट झाल्याचे आढळून आहे. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 2.4 टक्क्यांची वाढ झाली. शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 60.31 अंकांच्या वाढीसह 60,716वर उघडला. तर, एनएसईचा निफ्टी 21 अंकांच्या किंचित वाढ म्हणजेच 0.12 टक्क्यांनी 18,074 वर उघडला. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीच वाढ झाली. त्यामुळे मंगळवार आणि आज, या दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी चांगलाच फायदा कमावल्याचे दिसून आले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/senior-congress-leader-in-punjab-and-former-punjab-finance-minister-manpreet-singh-badal-resigned-from-congress-and-joined-bjp-today/
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, गेल्या दीड महिन्यांतील प्रतिकूल कामगिरीनंतर गेल्या 2-3 दिवसांत भारतीय बाजार प्रगती करत आहे. या ट्रेंडला एफआयआयच्या चलनात किरकोळ सुधारणा आणि देशांतर्गत गुंतवणुकीतील चढ-उतारामुळे समर्थन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
या शेअर्समध्ये वाढ झाली
टाटा स्टील- 2.60 टक्के
लार्सन अँड टुब्रो- 2.41 टक्के
यूपीएल – 1.83 टक्के
एफडीएफसी – 1.78 टक्के
या शेअर्समध्ये घट झाली
टाटा मोटर्स – 1.66 टक्के
एचडीएफसी लाईफ – 1.38 टक्के
अल्ट्राटेक सिमेंट – 1.28 टक्के
अदानी इंटरप्रायजेस – 1.17 टक्के
बीपीसीएल – 0.67 टक्के




