Stock Market: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज सोमवारी (२७ एप्रिल २०२६) जोरदार सुधारणा पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याच्या आशा आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. (Stock Market) या तेजीमुळे मुंबई शेअर (Stock Market) बाजारातील (BSE) सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल तब्बल ६.७७ लाख कोटी रुपयांनी वाढले असून, गुंतवणूकदारांसाठी हा आठवड्याचा पहिला दिवस लाभदायक ठरला. (Stock Market) आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ६३९.४२ अंकांच्या (०.८३%) वाढीसह ७७,३०३.६३ वर बंद झाला. तसेच, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ १९४.७५ अंकांच्या (०.८१%) तेजीसह २४,०९२.७० च्या पातळीवर स्थिरावला. (Stock Market) विशेष म्हणजे, आज निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक वधारले होते, ज्यामध्ये आयटी, फार्मा, रिअल्टी आणि कंझ्युमर ड्युरेबल क्षेत्रातील समभागांनी २ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत बाजाराला मोठी साथ दिली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप श्रेणीतील शेअर्समध्येही खरेदीचा ओघ दिसून आला. बाजार भांडवलात वाढ – (Stock Market) बाजार भांडवलाचा विचार करता, २४ एप्रिल २०२६ रोजी बीएसईवरील सर्व कंपन्यांचे एकूण मूल्य ४,६१,१७,४११.३३८ कोटी रुपये होते, जे आज वाढून ४,६७,९४,९०७.५९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी २३ समभाग आज नफ्यात बंद झाले. सन फार्माच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ७ टक्क्यांची वाढ झाली, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी आणि टेक महिंद्रा यांसारखे शेअर्स वधारले. Stock Market: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजीचे पुनरागमन; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6.77 लाख कोटींची भर दुसरीकडे, ॲक्सिस बँक, बीईएल आणि ट्रेंट यांसारख्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली. बीएसईवर आज एकूण ४५५६ शेअर्सचे व्यवहार झाले, त्यापैकी ३०७५ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १२८८ शेअर्समध्ये घसरण झाली. तेजीमागील कारणे – ( Stock Market) बाजारातील या तेजीमागे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची पाकिस्तान भेट आणि इराणने ‘होरमुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली करण्यासाठी अमेरिकेसमोर ठेवलेला प्रस्ताव ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. कच्च्या तेलाचे दर अद्याप प्रति बॅरल १०७ डॉलर्सच्या आसपास असले, तरी जागतिक तणाव कमी होण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. Stock Market जिओजित इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, अमेरिका-इराण संवाद आणि चौथ्या तिमाहीचे सकारात्मक निकाल यामुळे बाजाराने रिकव्हरी केली आहे. आता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आगामी धोरणांकडे लागले आहे. Stock Market