शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; टाटा समूहाच्या शेअर्समध्ये वाढ

Share Market | देशांतर्गत शेअर बाजारात आज जोरदार सुरूवात झाली आहे. 300 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 81,700 च्या वर उघडला, तर निफ्टीही सुमारे 100 अंकांच्या वाढीसह 25,100 च्या जवळ उघडला. बँक निफ्टी देखील 160 हून अधिक अंकांनी वाढला आणि हा निर्देशांक 51,150 च्या आसपास व्यवहार करत आहे.
निफ्टीवरील मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही वाढ झाली. मिडकॅप निर्देशांक 370 अंकांच्या वाढीसह 59,400 च्या वर जात होता. त्याच वेळी, स्मॉलकॅप निर्देशांक 100 अंकांच्या वाढीसह 18,900 च्या वर व्यवहार करत होता.
कोणते शेअर्स तेजीत?
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. टाटा समूहाचे शेअर्स हिरव्या चिन्हावर व्यवहार करताना दिसले. वाढत्या शेअर्समध्ये टाटा केमिकल्स 4.24 टक्के, ओबेरॉय रिॲल्टी 2.47 टक्के, डीएलएफ 2.20 टक्के, नाल्को 2.29 टक्के, पॉलीकॅब 2.24 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत. इंडियन हॉटेल्समध्ये 2.69 टक्के वाढ झाली आहे.
एफएमसीजी, फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांतील समभागांची वाढ वेगाने होत आहे. बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, एनर्जी, ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेटचे शेअर्स वेगाने व्यवहार करत आहेत. घसरलेल्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस 1.97 टक्के, डिव्हिस लॅब 0.80 टक्के, सीमेन्स 1.01 टक्के, ट्रेंट 0.80 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहेत.
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. याशिवाय Tata Elexi, IREDA चे निकालही जाहीर केले जातील. याशिवाय आर्केड डेव्हलपर्स, आनंद राठी वेल्थ देखील निकाल जाहीर करतील.




