शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात; आयटी शेअर्सची दमदार कामगिरी

Share Market | भारतीय शेअर बाजारात आज 12 जुलै 2024 रोजी शुक्रवारी जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. सुरुवातीच्या सत्रात, NIFTY 50 निर्देशांक 0.41% च्या वाढीसह 24,416.6 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, BSE सेन्सेक्स निर्देशांक देखील 0.39% च्या वाढीसह 80211.29 वर व्यापार करत आहे. बँक निफ्टीच्या 12 पैकी 10 शेअर्स तेजीत आहेत.
टीसीएस, आणि टेक महिंद्रा आज BSE वर सर्वात जास्त वाढले, याशिवाय विप्रो, एलटीआय लिमिटेड लिमिटेड, एचसीएल, इन्फोसिस विप्रो, एलटीआय लिमिटेड, आयटीसी आणि बीपीसीएल या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तर मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, सन फार्मा, पॉवर ग्रिड, एल अँड टी या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
यावेळी आयटी शेअर्समध्ये चांगली खरेदी होताना दिसत आहे. आयटी निर्देशांक 1.5% वर व्यापार करत आहेत. पॉवर आणि रियल्टी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. बीएसईचे बाजार भांडवल 452.04 लाख कोटी रुपये झाले आहे जे यूएस डॉलरमध्ये $5.41 ट्रिलियन आहे. बीएसईवर 3252 शेअर्सचे व्यवहार होत असून 1814 शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. Share Market |
तर 1316 शेअर्समध्ये घसरण झाली असून 122 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार होत आहेत. 108 शेअर्सवर अप्पर सर्किट आणि 50 शेअर्सवर लोअर सर्किट आहे. 171 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत आणि 10 शेअर्स कमी किमतीत असल्याचे दिसत आहे. Share Market |
हेही वाचा:




