Stock Market : बजाज फायनान्सचा शेअर उसळला, शेअर्समध्ये झाली ‘इतक्या’ टक्क्यापर्यंत वाढ

मुंबई – बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर्व्ह या कंपन्यांनी पहिल्या तिमाहीचे चमकदार ताळेबंद जाहीर केल्यानंतर आज या दोन्ही कंपन्यांच्या शेअरच्या भावात पाच टक्क्यापर्यंत वाढ झाली.
बजाज फायनान्स कंपनीच्या शेअरचा भाव पाच टक्क्यांनी वाढून 5,929 रुपयांवर गेला. तर बजाज फिन्सर्व्ह या कंपनीच्या शेअरचा भाव पाच टक्क्यांनी वाढून 12,075 रुपयांपर्यंत गेला होता. बजाज फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता वाढवून 2.04 लाख कोटी रुपये झाली आहे.
गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 1.56 लाख कोटी रुपये इतकी होती. या दोन कंपन्यानी चांगला ताळेबंद जाहीर केल्यामुळे इतर बॅंकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावातही वाढ झाली असल्याचे दिसून आले. या दोन कंपन्यांनी चांगला ताळेबंद जाहीर केला आहे त्यामुळे इतर बॅंका आणि वित्तीय कंपन्यही चांगला ताळेबंद जाहीर करतील असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. बॅंकांची परिस्थिती बळकट असल्यानंतर त्या कर्जपुरवठा वाढवू शकतील.




