Stock Market: आनंद राठी वेल्थचा शेअर वधारला
Updated On:

मुंबई – आनंद राठी वेल्थ या कंपनीचा आयपीओ गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना उपलब्ध करण्यात आला होता. या कंपनीच्या शेअरची शेअर बाजारावर नोंदणी झाली. सकाळी या शेअरच्या किमती नऊ टक्क्यांनी वाढल्या होत्या.
सायंकाळी बाजार बंद होताना कंपनीचा शेअर सहा टक्क्यांनी वाढला होता. आयपीओ मधील शेअरची किंमत 550 रुपये होती. बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजारात या शेअरची किंमत 585 रुपये प्रति शेअर इतकी होती. या शेअरच्या भावावर आधारित आनंद राठी वेल्थ कंपनीचे बाजार मूल्य 2,428 कोटी रुपये इतके आहे.




