Share Market Updates: आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आज (14 जानेवारी) बाजारात काहीसी तेजी दिसून आली. आज BSE सेन्सेक्स 5.74 अंकांच्या वाढीसह 76,335.75 वर उघडला. तर NSE निफ्टी 79.95 अंकांच्या वाढीसह 23,165.90 वर उघडला. बाजारातील विक्रीवर काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून आले. शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात तेजी पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स 387.15 अंकांनी वाढून 76,717.16 वर पोहोचला. तर एनएसई निफ्टीमध्ये 115.15 अंकांच्या वाढी पाहायला मिळाली. यासह निफ्टी 23,201.10 अंकांवर ट्रेड करत आहे. आतापर्यंत सकाळच्या सत्रात बाजारात सकारात्मक कल दिसून आला आहे. अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये मोठी वृद्धी पाहायला मिळाली आहे. प्रामुख्याने अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्यूशन्समध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाली. अदानी पॉवरच्या शेअर्सच्या किंमतीत सकाळच्या सत्रात 10 टक्क्यांची वाढ दिसून आली. याशिवाय, मेटल, पीएसयू बँक आणि मीडिया स्टॉक्समध्येही वृद्धी दिसून आली. दरम्यान, या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. बाजार बंद होताना BSE सेन्सेक्स 1,048.90 अंकांनी घसरून 76,330.01 वर, तर निफ्टी 345.55 अंकांना घसरून 23,085.95 वर बंद झाला होता. एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 12.39 लाख रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळाले. तर मागील 4 सत्रांमध्ये गुंतवणूकदारांना तब्बल 24.69 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.