Stock Market News : शेअर निर्देशांक कोसळले एक टक्क्याने ; बॅंकांच्या शेअरची…

मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्रीचा मारा वाढला असतानाच देशातील गुंतवणूकदारानी बॅंकिंग आणि वित्तीय संस्थांच्या शेअरची तुफान विक्री केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ एक टक्क्याने कोसळले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 773 अंकांनी कोसळून 60,205 अंकावर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 226 अंकांनी म्हणजे सव्वा टक्क्यांनी कोसळून 17,895 अंकावर बंद झाला. बऱ्याच दिवसानंतर हा निर्देशांक 18,000 अंकाच्या खाली आला आहे.
जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, लवकच भारताचा अर्थसंकल्प साजरा होणार आहे. अमेरिकेच्या फेडरल रिजर्व्हच्या पतधोरण समितीची बैठक सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार अस्वस्थ झाले असून त्यांच्याकडून विक्री वाढली आहे.
स्टेट बॅंकेचा शेअर 4.3 टक्क्यांनी कोसळला. इंडसइंड बॅंक, एचडीएफसी बॅंक, ऍक्सिस बॅंक, एचडीएफसी, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, विप्रो, महिंद्रा या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. असे असतानाच हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती, टाटा स्टील, एनटीपीसी, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/important-decision-of-central-government-to-reduce-wheat-prices-30-lakh-tonnes-of-wheat-will-come-in-the-open-market/
मिडकॅप 1.52 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.94% कोसळला. मुंबई शेअर बाजाराच्या ऊर्जा, बॅंकिंग वित्तीय सेवा, दूरसंचार, तेल आणि नैसर्गिक वायू, भांडवली वस्तू या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
परदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री
परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत आहेत. काल या गुंतवणूकदारांनी तब्बल 2,393 कोटी रुपयांचे शेअरची विक्री केली. पुढील आठवड्यात अमेरिकेचे पत धोरण जाहीर होणार आहे. ते नकारात्मक असण्याची भीती या गुंतवणूकदारांना वाटत आहे. इतर देशातील शेअर या गुंतवणूकदारांना स्वस्तात मिळत असल्यामुळे भारतातून ही गुंतवणूक तिकडे वळत असल्याचे काहींना वाटते.




