Stock Market: जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराणमधील वाढत्या भू-राजकीय तणावाचे सावट भारतीय शेअर बाजारावर मंगळवारी पाहायला मिळाले. बँकिंग, रियल्टी आणि ऑईल-गॅस क्षेत्रातील विक्रीच्या दबावामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी मागील सत्रातील आपली वाढ गमावली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर BSE सेन्सेक्स २५१.६१ अंकांनी (०.३३%) घसरून ७७,०१७.७९ वर बंद झाला, तर निफ्टी-५० ८६.५० अंकांनी (०.३६%) तुटून २४,०३२.८० अंकांवर स्थिरावला. (Stock Market) BSE सेन्सेक्स ७७,१०३.७२ वर उघडल्यानंतर इंडेक्सने ७७,१५१.३३ ची उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र, विक्रीच्या दबावामुळे तो ७६,५१५.०३ पर्यंत खाली आला होता. तर २४,०५२.६० वर सुरुवात करणाऱ्या निफ्टीने २३,८८२.०५ चा निचांक गाठला, मात्र सरतेशेवटी २४,००० ची महत्त्वाची पातळी राखण्यात यश मिळवले. तणावाचा ‘कच्च्या तेला’वर परिणाम – स्ट्रेट ऑफ होर्मुज (Strait of Hormuz) जवळ अमेरिका आणि इराणमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याच्या वृत्ताने जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे. इराणकडून कार्गो जहाजांना लक्ष्य केले जात असल्याच्या आरोपांनंतर अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा दिला आहे. या तणावामुळे ब्रेंट क्रूडच्या किमती ११५.३० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम रुपयाच्या घसरणीवर आणि भारतीय बाजाराच्या मानसिकतेवर झाला आहे. क्षेत्रीय कामगिरी (Sectoral Update) बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला, निफ्टी बँक, रियल्टी, ऑईल अँड गॅस आणि वित्तीय सेवा क्षेत्रावर दबाव राहिला. तर ऑटो, एफएमसीजी (FMCG), आयटी, फार्मा आणि मेटल्स शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मोठ्या शेअर्समध्ये घसरण असली तरी मिडकॅप (०.१७%) आणि स्मॉलकॅप (०.२८%) निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले. तज्ज्ञांचे मत: “निवडणुकीनंतरचा उत्साह आता ओसरताना दिसत असून जागतिक भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रुपया विक्रमी निचांकी पातळीवर गेला आहे. मात्र, कॉर्पोरेट निकालांच्या अपेक्षेमुळे काही शेअर्समध्ये खालच्या स्तरावर खरेदी (Bottom-fishing) पाहायला मिळत आहे,” असे जिओजित इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी नमूद केले. जागतिक बाजारांची स्थिती – Stock Market: अमेरिका-इराण तणावाचा बाजाराला फटका; सेन्सेक्स 252 अंकांनी घसरला अमेरिकेचा डाऊ जोन्समध्ये १.१३% तर एस अँड पी ५०० मध्ये ०.४१% ची घसरण झाली. तसेच दक्षिण कोरियाचा कोस्पी (Kospi) ५% वाढून विक्रमी स्तरावर पोहोचला, तर हाँगकाँगचा हँग सेंग १.५६% ने घसरला. (Stock Market)