Stock Market: गुंतवणूकदारांचा 5 लाख कोटींचा फायदा
Updated On:

मुंबई – शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात देशातील गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक एकाच दिवसात तीन टक्क्यांनी वाढले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या शेअरचे मुल्य एकाच दिवसात पाच लाख कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले.
आता शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 254 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत असताना देशातील गुंतवणूकदार दीर्घ पल्ल्याचा विचार करून ही खरेदी करीत असल्याचे काही विश्लेषकांनी सांगितले. युध्द जर लवकर संपुष्टात आले तर आता खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना त्याचा लाभ होणार आहे.
टॅग्स:





