Stock Market 22 July: बजेटच्या एक दिवस आधी गुंतवणूकदारांनी कमावले ₹ 2.06 लाख कोटी, मात्र सेन्सेक्स -निफ्टी रेडझोनमध्ये बंद

Stock Market 22 July: आर्थिक वर्ष 2024-25 चे बजेट सादर होण्याच्या एक दिवस आधी, आज सोमवारी देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 रेड झोनमध्ये बंद झाले. सुरुवातीच्या घसरणीनंतर आज बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला आणि रेड झोनमधून तो ग्रीन झोनमध्ये पोहोचला पण दिवसअखेर तो घसरणीसह बंद झाला.
तथापि, सुरुवातीच्या दबावातून सावरल्याने, मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये मजबूत खरेदीचे वातावरण परतले. एकूणच, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 2.06 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.06 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
BSE सेन्सेक्स सध्या 102.57 अंक किंवा 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह 80,502.08 वर बंद झाला आहे आणि निफ्टी 21.65 अंक किंवा 0.62 टक्क्यांच्या घसरणीसह 24509.25 वर बंद झाला आहे. इंट्रा-डेमध्ये सेन्सेक्स 80,100.65 आणि निफ्टी 24,362.30 पर्यंत घसरला होता.
क्षेत्रानुसार दिवसअखेर FMCG, IT, मीडिया, रियल्टी आणि ऑइल अँड गॅसचे निफ्टी निर्देशांक घसरणीसह बंद झाले. तर ऑटो, मेटल आणि फार्मा निर्देशांक प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.06 लाख कोटी रुपयांची वाढ –
एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 19 जुलै 2024 रोजी, BSE वर सूचीबद्ध सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,46,38,826.75 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 22 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच तो 4,48,45,457.62 कोटी रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 2,06,630.87 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.




