शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स ४५१ अंकांनी घसरला ; निफ्टी ५० देखील लाल रंगात ओपन

Stock Market । भारतीय शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात म्हणजेच आजच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी, मोठ्या घसरणीने झाली. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ४५१.६६ अंकांनी किंवा ०.५५ टक्क्यांनी घसरून ८२,०४९.१६ वर लाल रंगात उघडला. एनएसई निफ्टी ५० देखील १०८.०५ अंकांनी घसरून २५,१७७.३० वर उघडला.
सकाळी ९:२५ वाजता, सेन्सेक्स २५३ अंकांनी घसरून ८२,२४७ वर व्यापार करत होता. निफ्टी ५० देखील ७४ अंकांनी घसरून २५,२११ वर व्यापार करत होता.
बीएसई सेन्सेक्स बास्केटमध्ये टॉप गेनर Stock Market ।
भारती एअरटेल, एशियन पेंट्स, इटरनल, बजाज फायनान्स
सेन्सेक्समध्ये टॉप लुझर्स
टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयएनएफवाय, बीईएल
शुक्रवारी बाजार कसा होता? Stock Market ।
शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी, भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स ३२८.७२ अंकांनी म्हणजेच ०.४० टक्के वाढून ८२,५००.८२ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १०३.५५ अंकांनी म्हणजेच ०.४१ टक्के वाढून २५,२८५.३५ वर बंद झाला. दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले.
बीएसई बास्केटमधून एसबीआय, मारुती, अॅक्सिस बँक, एनटीपीसी आणि पॉवरग्रिड हे सर्वाधिक वाढणारे होते. टाटा स्टील, टीसीएस, टेक महिंद्रा आणि टायटन लाल रंगात बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही वाढ झाली. ऑटो, बँकिंग आणि एफएमसीजी निर्देशांकांचा दिवसाचा व्यवहार हिरव्या रंगात संपला. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात, निफ्टी मेटल शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठे नुकसान केले. हिंद कॉपर कंपनीचे शेअर्स ६ टक्क्यांनी घसरले.





