लंडन – कोरोनाचा संसर्ग वाढल्यास दर 16 सेकंदाला एक मृत बालक जन्माला येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी कोष (युनिसेफ) ने म्हटले आहे. त्यामुळे कोरोना आजारामुळे गरोदर महिला व त्यांच्या बाळावरील धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
प्रसुतीदरम्यान किंवा प्रसुतीनंतर बालकाचा मृत्यू झाल्यास त्याला ‘स्टिलबर्थ’ असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, दरवर्षी जगभरात एकूण 20 लाख बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाचे प्रमाण वाढले तर स्टीलबर्थचेही प्रमाण वाढू शकते.
मागील वर्षी दक्षिण आशियात जन्माला आलेल्या चार बालकांपैकी तीन स्टिलबर्थ ची प्रकरणे होती. युनिसेफच्या कार्यकारी संचालक हॅनरिटा फोर यांनी सांगितले की, जर सुरक्षित प्रसुती आणि प्रसुतीपुर्वी योग्य ती काळजी घेतल्यास स्टीलबर्थ प्रकरणे रोखता येऊ शकतात.
स्टीलबर्थ प्रकरणाचा सर्वाधिक फटका हा विकसनशील आणि गरीब देसांना बसणार आहे. तसेच 117 विकसनशील देशात जवळपास दोन लाख स्टीलबर्थ होण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
एकून आकडेवारीनुसार निम्मी प्रकरणे ही उप-सहारा आफ्रिका व मध्य आशियातील आहेत. तर, युरोप, उत्तर अमेरिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशामध्ये स्टीलबर्थचे प्रमाण हे केवळ सहा टक्के आहे.
त्यामुळे, स्टीलबर्थचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्याचा धोका टाळण्यासाठी प्रसुतीपुर्व आणि प्रसुतीनंतर काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.