‘आनंदनगरची धारावी होऊ नये यासाठी पाऊले उचला’

पिंपरी – चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत करोनाने शिरकाव केला आहे. हा परिसर महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. महापालिकेने या भागाकडे विशेष लक्ष पुरविणे अत्यंत महत्वाचे आहे. येथे मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असून या परिसराची धारावी होऊ नये, यासाठी महापालिकेने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी नगरसेवक शैलेश मोरे यांनी केली आहे.

नगरसेवक मोरे म्हणाले की, आनंदनगरमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यासाठी आपण लोकांना भेटून सुुरक्षेच्या उपयोजनांची माहिती देत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. तसेच अत्यावश्‍यक तथा जीवनावश्‍यक मदतीसाठीही आपण तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. इतर प्रभागांपेक्षा आनंदनगर मधील परिसर विशेष आहे. या भागाकडे महापालिकेने अधिक लक्ष पुरविणे गरजेचे आहे. अन्यथा करोनाचा भडका होऊ शकतो. महापालिकेकडे याबाबतीत पाठपुरावा सुरु आहे. आनंदनगरची धारावी होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.