Stephen Fleming : धोनीच्या फलंदाजीबाबत चेन्नईचे कोच स्टिफन फ्लेमिंग यांनी केला ‘हा’ मोठा खुलासा

चेन्नई : महेंद्रसिंह धोनी सामन्यादरम्यान लवकर फलंदाजीला का येत नाही यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने (Stephen Fleming) याबाबत मोठा खुलासा केला आहे. धोनीचे शरीर, त्याचे गुडघे आता पूर्वीसारखे नाहीत. तो व्यवस्थित मुव्ह होतो, पण तरीही ते पूर्णपणे ठिक नाहीत. धोनी संपूर्ण १० षटकेही मैदानावर फलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे तो संघासाठी कशी भूमिका बजावणार, हे त्या दिवसासाठी तो ठरवतो, असे फ्लेमिंग यांनी सांगितले आहे.
दरवेळी प्रत्येक सामन्यामध्ये धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार यावरून जोरदार चर्चा होते. चेन्नईला गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी क्रमामुळे धोनीवर टीका होत आहे. रॉयल चॅलेंजर बंगळुरुविरूद्ध सामन्यात धोनी ९व्या क्रमांकवर फलंदाजीला उतरला, तोपर्यंत सामना संघाच्या हातून निसटला होता. तर राजस्थानविरूद्ध धोनी लवकर फलंदाजीला उतरला पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. धोनी ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, जिथे त्याने १६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. धोनीने आपल्या खेळीत तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. मात्र, ९व्या क्रमांकावर फलंदाजी केल्याबद्दल त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.
राजस्थान रॉयल्सविरूद्ध पराभवानंतर फ्लेमिंग यांनी धोनीच्या शारिरीक स्थिबाबत मोठे वक्तव्य केले अशून आथा चाहते त्यावर कशी प्रतिक्रीया देतात याकडे लक्ष लागले आहे. सामना संतुलित असेल, तर तो थोडा लवकर फलंदाजीला येतो आणि बाकीच्या वेळेस तो इतर खेळाडूंना संधी देतो. तर धोनी या सगळ्या गोष्टी पाहून समतोल साधत आहे.”
चेन्नईचा संघ धोनीला न खेळवण्याचा विचार करत नाही. धोनी संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी गेल्या वर्षीही म्हटले होते की तो संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचे नेतृत्व आणि यष्टीरक्षण खूप मोलाचे आहे, त्यामुळे धोनीला ९-१० षटके खेळण्यासाठी फलंदाजीसाठी पाठवले जाणार नाही. तो इतक्या उशिरा कधीच फलंदाजीसाठी उतरला नाही. तो १३-१४ षटकांनंतरच फलंदाजीला उतरतो. तो काय स्थिती आहे ते पाहतो, अशी सारवासारवही फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी नंतर केली आहे.





