स्टेन्टच्या किंमतीत 1,200 रुपयांनी वाढ

पुणे – नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात गाड्या आणि अन्य गोष्टी कशा महागल्या तशी किंमती जशा महागल्या आता हृदयाच्या दुरुस्तीची “कॉस्ट’ वाढली असून, एकप्रकारे हृदयाचे “ओव्हरऑईलिंग’ करणाऱ्या “स्टेन्ट’ची किंमत एक एप्रिल पासून वाढली आहे. या स्टेण्टसाठी आता आधीपेक्षा सुमारे 1200 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

वाढता ताण, नोकरी व्यवसायातील चिंता, बदललेली लाईफस्टाइल, खाण्यातील बदल, फास्टफुडचा मारा या सगळ्या गोष्टींमुळे हृदयरोगाच्या प्रमाणात अतिशय वाढ झाली असून, त्यातून ब्लडप्रेशरसारखी कायमस्वरूपी व्याधी निर्माण होते. या व्याधीचे प्रमाण वाढले तर त्यातून हृदयात ब्लॉकेजेस निर्माण होऊन हृदयाची क्रिया बंद पडण्यापर्यंत प्रकार घडतात.
अशावेळी तातडीने उपाययोजना म्हणून ऍन्जिओप्लास्टी केली जाते. अर्थात ऍन्जीओग्राफी केल्यानंतर त्याचवेळी ऍन्जीओप्लास्टी करण्याचा निर्णय 95 केसेसमध्ये घेतला जातो. त्यावेळी ह्रदयात स्टेन्ट घालण्यात येते. नव्या आर्थिक वर्षांत हे देखील महाग झाले असून, या स्टेन्टच्या किंमतीत 4.26 टक्‍क्‍यांनी वाढवण्याचा निर्णय “नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऍथॉरिटी’ने (एनपीपीए) ने घेतला आहे. ही वाढ गेल्यावर्षीच करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र ती नियंत्रित करण्यात आली होती.

नव्या किंमतीनुसार “बेअर मेटल स्टेन्ट’ ची किंमत 8 हजार 261 रुपये, ड्रग्ज एल्युटिंग स्टेन्ट ची किंमत 30 हजार रुपये करण्यात आल्याचे “एनपीपीए’ने जाहीर केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.