Statue of Swami Vivekananda : थोर भारतीय तत्वज्ञ आणि धार्मिक नेते असलेल्या स्वामी विवेकानंदांचा (Statue of Swami Vivekananda) पुर्णाकृती पुतळा अमेरिकेत सिएटल येथे उभारण्यात आला आहे. अमेरिकेत उभारला गेलेला स्वामी विवेकानंदांचा हा पहिलाच पुर्णाकृती पुतळा आहे. सिएटलमधील अत्यंत व्यस्त वेस्टलेक चौकामध्ये हा पुर्णाकृती ब्रांझचा पुतळा (Statue of Swami Vivekananda) उभारण्यात आला आहे. अमेरिकेतल्या एखाद्या शहराच्या प्रशासनाकडून अमेरिकेत कोठेही आतापर्यंत स्वामी विवेकानंदांचा पुतळा उबारण्यात आला नव्हता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सिएटलचे महापौर कॅटी विल्सन आणि सिएटलमधील भारतीय वाणिज्य दूतावासाचे महावाणिज्य दूत प्रकाश गुप्त यांनी संयुक्तपणे या पुतळ्याचे (Statue of Swami Vivekananda) अनावरण शनिवारी केले. भारतीय मूर्तीकार नरेश कुमार कुमावत यांनी हा पुतळा घडवला आहे. शिकागो येथे १८९३ साली झालेल्या सर्वधर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदांचे भाषण जगप्रसिद्ध आहे. Statue of Swami Vivekananda १८९३ साली शिकागोपासून २०२६ साली सिएटलच्या चौकापर्यंत आता स्वामी विवेकानंदांच्या रुपाने महान भारतीय प्रतीक उभे राहिले आहे. स्वामी विवेकानंदांचे स्मारक शहराच्या मध्यवस्तीत उभे करणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे. असे सिएटलमधील भारताचे महावाणिज्यदूत नरेश कुमार कुमावत यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या स्मारकामुळे सिएटलचे सर्वसमावेशक चैतन्य दिसून येते आणि भारत आणि अमेरिकेच्या पॅसिफिक वायव्य भागातील वैविध्यपूर्ण महानगरीय तंत्रज्ञान केंद्रातील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट झाले आहेत, असे विल्सन यांनी सांगितले. सिएटलच्या उच्च बहुसांस्कृतिक ओळख आणि सर्वसमावेशक भूमिकेची दखल घेऊन सिएटलमधील इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्सने हा पुतळा सिएटल शहराला भेट दिला आहे, असे सिएटलमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. आयसीसीआरच्या स्थापना दिनानिमित्त आणि व्यापक सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी, अमेरिका-भारत दोन्ही देशातील जनतेतील थेट संबंधांसाठी घेतलेल्या पुढाकारातून या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अनावरणाच्या समारंभाला ग्रेटर सिएटल भागातील स्थानिक महापौर, समुदायांचे प्रतिनिधी आणि अमेरिकेतील भारतीय समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.