निकालात २.०१ टक्केने घट Maharashtra ssc Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९२.०९ टक्के एवढा लागला आहे. निकाल सकाळी ११.३० वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात २.०१ टक्क्याने घट झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत. (Maharashtra ssc Result) दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी तब्बल १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त संचिंद्र प्रताप सिंह, सचिव डॉ. दीपक माळी उपस्थित होते. Maharashtra ssc Result : राज्याचा दहावीचा ९२.०९ टक्के निकाल ; मुलींनीच मारली बाजी मुलींचा निकाल – ९४.९६ टक्के मुलांचा निकाल – ८९.५६ टक्के मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.४० टक्के ने अधिक आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९७.६२ टक्के. सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ टक्के आहे. विभागनिहाय निकाल (Maharashtra ssc Result ) पुणे – ९४.२४ नागपुर – ८९.७ छत्रपती संभाजीनगर – ८८.४१ मुंबई – ९४.९७ कोल्हापूर – ९५.४७ अमरावती – ९०.५० नाशिक – ९०.५३ लातूर – ८८.४२ कोकण -९७.६२