रेडा -धनगर समाजाच्या प्रलंबित असणाऱ्या एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी त्वरित करावी, इतर मागणीसाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधत धनगर ऐक्य अभियान राज्य यांच्या वतीने मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन देऊन मागण्यांची त्वरित पूर्तता करावी, अशी मागणी धनगर ऐक्य अभियानाचे प्रमुख डॉ. शशिकांत तरंगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मागण्यांचे निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे सदस्य महेंद्र रेडके, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, पोपट पवार, ज्ञानदेव डोंबाळे, विशाल मारकड, दत्तू पांढरे, धनाजी देवकाते, महादेव पांढरे, वैभव तरंगे, लेमन गावडे, नितीन गोफणे, आण्णा शेंडगे उपस्थित होते.