Nagar | पेमराज सारडा महाविद्यालयात राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धा

नगर, (प्रतिनिधी) – हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय शारदा करंडक व ज्ञानेश्वर करंडक वाद-विवाद स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या दि. ९ ऑक्टोबर रोजी स्पर्धेस प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शिरिष मोडक यांनी दिली.
पेमराज सारडा महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात बुधवारी (दि.९) सकाळी ९ वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. शारदा करंडक वाद स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालयांसाठी असून स्पर्धेचा विषय. ‘सोशल मीडियामधे अडकलेली तरुणाई वास्तवाचे भान हरवत आह
ज्ञानेश्वर करंडक बाद स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयांसाठी असून स्पर्धेचा विषय ‘स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सरकारपेक्षा संस्कार महत्वाचे आहे’ असा आहे. प्रत्येक स्पर्धेत महाविद्यालयाला दोन विद्यार्थ्यांचा संघ पाठविता येईल. त्यापैकी एक विद्यार्थी प्रस्तावाच्या बाजूने व दुसरा विरुद्ध बाजूने भूमिका मांडेल.
प्रत्येक स्पर्धकाला १० मिनिटे वेळ दिला जाईल. दोन्ही स्पर्धासाठी प्रत्येकी सांधिक प्रथम तीन क्रमांकाची रोख पारितोषिके देण्यात येतात. तसेच प्रत्येक स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांना व्यक्तिगत रोख पारितोषिके देण्यात येतात.
शारदा करंडक प्रथम क्रमांक विजेत्या संघाला चांदीची शारदेची मूर्ती व ज्ञानेश्वर करंडक प्रथम क्रमांकाच्या संघाला संत ज्ञानेश्वरांची चांदीची मूर्ती करंड म्हणून प्रदान करण्यात येते. हे दोन्ही करंडक फिरते आहेत.
राज्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आणि अनेक वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. या स्पर्धा यशस्वी कराव्यात, असे आवाहन मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष, ॲड. अनंत फडणीस,
सुमतिलाल कोठारी, प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, उपप्राचार्य मिलिंद देशपांडे, उपप्राचार्य डॉ. मंगला भोसले, पर्यवेक्षक डॉ. सुजित कुमावत, पर्यवेक्षक गिरीष पाखरे, डॉ. राजू रिक्कल, प्रबंधक अशोक असेरी, शारदा करंडकाचे निमंत्रक डॉ. राजेंद्र मारवाडे, ज्ञानेश्वर करंडकाचे निमंत्रक प्रा. होले गोपीनाथ यांनी केले आहे.
या स्पर्धासाठी पारितोषिके
प्रथम क्रमांक भव्य रौप्य करंडक व ५ हजार १०० रूपये रोख
व्दितीय क्रमांक रौप्य चषक व ३ हजार १०० रूपये रोख
तृतीय क्रमांक रौप्य चषक व २ हजार १०० रूपये रोख
वैयक्तीक पारितोषिके.
प्रथम क्रमांक २ हजार १०० रूपये रोख
व्दितीय क्रमांक १ हजार ५०० रूपये रोख
तिसऱ्या क्रमांकास १ हजार २०० रूपये रोख

