जनकल्याण रक्तपेढीचा राज्यसरकारतर्फे सन्मान
Updated On:

पुणे : “महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषद’ यांच्या माध्यमातून प्रभावी काम करणाऱ्या रक्त केंद्रांचा सन्मान मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून (14 जून) हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न आणि औषध प्रसासन मंत्री राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. महाराष्ट्रात शासकीय 76 आणि अन्य 300 मिळून 376 रक्तपेढ्या कार्यान्वित आहेत. त्यातील 6 सरकारी आणि 6 अशासकीय अशा 12 रक्तपेढ्यांचा सन्मान करण्यात आला.
कोविडसारख्या कठीण काळात सुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करून रुग्णांची उत्तम सेवा केल्याबद्दल जनकल्याण रक्तपेढीचा सन्मान करण्यात आला. हा सत्कार वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश कांबळे, रवी कुलकर्णी आणि स्वेच्छा रक्तदान विभाग व्यवस्थापक संतोष अनगोळकर यांनी स्वीकारला.





