सातारा- लोकसभा पार्श्वभूमीवर आदर्श आचासंहिता कालावधीत दि. 1 एप्रिल 2019 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 दुचाकी वाहनांसह एकूण 2 लाख 18 हजार 065 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांनी दिली. यामध्ये मौजे खेड जि. सातारा येथे फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओनली करिता असलेल्या बेकायदा विदेशी दारु विक्रीचा साठ्यावर छापा घालुन संशयित आरोपीत राहुल हणमंत शेडगे रा.खेड जि. सातारा याच्या ताब्यातून 750 मिली क्षमतेच्या विदेशी दारुच्य एकूण 161 सिलबंद बाटल्या जप्त करुन त्याच्या ताब्यातून 89300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला तसेच मौजे मोरेवाडी ता. जावली येथून संशयित आरोपी मदन आनंदराव मोरे रा. मोरेवाडी ता. जावली याच्या ताब्यातून दुचाकी वाहनासह 750 मिली क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकूण 9 सिलबंद बाटल्या जप्त करुन त्याचे ताब्यातून 45,700/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला.
तसेच मौजे सायगाव ता.जावली जि.सातारा येथून संशयित आरोपीत जगदिश शिवलिंग राजमाने रा. सायगाव ता. जावली जि. सातारा याच्या ताब्यातून तीव्र बिअरचा एकूण 1805/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. मौजे आरफळ जि. सातारा येथून संशयित आरोपीत शिवाजी साहेबराव पवार आरफळ जि. सातारा याचे ताब्यातून दुचाकी वाहनासह 750 मिली क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकूण 44 सिलबंद बाटल्या जप्त करुन एकूण 72880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मौजे हमदाबाद जि. सातारा येथून संशयित आरोपी राजेंद्र लक्ष्मण जाधव रा. हमदाबाद जि. सातारा याचे ताब्यातून दुचाकी वाहनासह 750 मिली क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकूण 14 सिलबंद बाटल्या जप्त करुन एकूण 8320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांचे ताब्यातून फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओनली करिताअसलेल्या विदेशी दारुच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 229 सिलबंद बाटल्या 330 मिली क्षेमतेचे बिअरचे एकूण 19 डबे तसेच 750 मिली क्षमतेच्या वाईनच्या एकूण 4 बाटल्या व या कारवाईमध्ये प्रभारी निरीक्षक एस.डी.शिलेवंत, दु. निरीक्षक एन. एल. शिंदे, सचिन खा, महेश मोहिते, जीवन शिर्के, नितिन जाधव, राजेंद्र आवघडे,अजित रसाळ, अरुण जाधव, सागर साबळे, पुढाली तपास दु. निरीक्षक एन. एल. शिंदे, हे करीत आहे.