मावळात भात लावणीला सुरुवात

पवनानगर -मावळात आंबेमोहर, साळ, दोडकी, कोळम, इंद्रायणी या पारंपरिक भातबियाणांसह कोकणी, पार्वती, फुलेसमृद्धी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरूची, वैष्णवी व तृप्ती या संकरित विकसित भातबियाणांच्या वाणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मावळ तालुक्‍यात पारंपरिक, चारसूत्री, पट्टा पद्धत, एसआरटी व इतर पद्धतीने भातलागवड केली जाते. मावळात पावसाने सुरुवातीला जोरदार हजेरी लावल्याने लावणीला सुरुवात झाली आहे.

पवनमावळ परिसरातील शेतकऱ्यांनी पवना धरणाच्या पाण्यावर भात पेरणी केली होती. ती रोपे चांगल्या प्रमाणात उगवून आली आहेत. ती लावण्या योग्य झाल्याने तसेच पाऊस चांगला झाल्याने भातखाचरात मुबलक पाणी झाल्याने शेतकऱ्यांनी आता भात लावणीला सुरुवात केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.