FIFA World Cup | सलाहने दिले निवृत्तीचे संकेत

कैरो – प्रेक्षकांनी डोळ्यांवर मारलेल्या लेझर बीममुळे पेनल्टी शुटआऊटमध्ये गोल करण्यास असमर्थ ठरलेला स्टार फुटबॉलपटू महंमद सलाह याने इजिप्तच्या पराभवामुळे निराश होत निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्याने इजिप्त विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता लढतीत पराभूत झाल्यानंतर सलाह खूपच निराश झाला आहे.
सेनेगलविरुद्धच्या पात्रता स्पर्धेतील लढतीत सलाहला मोक्याच्या क्षणी गोल करता आला नाही. प्रेक्षकांनी त्याच्या डोळ्यांवर तब्बल तीन हजार लेझर बीमचा मारा केला होता व त्यामुळे त्याने मारलेला फटका गोलपोस्टच्या वरुन गेला व गोल झाला नाही. प्रेक्षकांनी या खेळाला काळिमा फासला होता. मात्र, त्याचा फटका आता इजीप्त संघाला बसला आहे.
सलाहने इजिप्तकडून 2011 सालापासून आपली कारकिर्द सुरू केली. त्याने 2017 सालच्या विश्वकरंडक पात्रता सामन्यात अखेरच्या मिनिटाला कांगो विरूद्ध गोल करत सर्वांचे लक्ष वेधले होते. या गोलमुळे इजिप्त 2018 सालच्या विश्वकरंडर स्पर्धेला पात्र ठरला होता.




