Upcoming IPO: पैसे तयार ठेवा, बाजारात येतोय ‘या’ कंपनीचा IPO; GMP मध्ये जबरदस्त प्रतिसाद

Standard Glass Lining IPO Details: वर्ष 2024 मध्ये आलेल्या सर्वच आयपीओंना गुंतवणुकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आयपीओच्या माध्यमातून गुंतवणुकादारांची मोठी कमाई देखील झाली आहे. आता नवीन वर्षात देखील अनेक चांगल्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. 6 जानेवारीला बाजारात Standard Glass Lining कंपनीचा आयपीओ येणार आहे. ग्रे मार्केटमध्ये या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नोलॉजी लिमिटेड
स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नोलॉजी लिमिटेडचा आयपीओ 6 जानेवारी 2025 ला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीआयच्या माध्यमातून बाजारातून 410.05 कोटी रुपये उभारणे हा कंपनीचा उद्देश आहे. हा आयपीओ 410.05 कोटी रुपयांचा बुक बिल्ट इश्यू आहे. यामध्ये 210 कोटी रुपयांचे 1.50 कोटी नवीन शेअर्स आणि 200.05 कोटी रुपयांच्या 1.43 कोटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा (OFS) समावेश आहे.
आयपीओचा प्राइस बँड
स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नोलॉजी लिमिटेड आयपीओचे किंमत बँड 133 ते 140 रुपये प्रति शेअर निर्धारित करण्यात आले आहे. याची लॉट साइज 107 शेअर्स एवढी आहे. म्हणजेच, किरकोळ गुंतवणुकदारांना कमीत कमी 14,980 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. अनलिस्टेड शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम 88 रुपये आहे. हे कॅप किंमतीच्या तुलनेत 62.8 टक्के आहे. त्यामुळे आयपीओ लिस्ट होताच गुंतवणुकादारांना मोठा नफा होऊ शकतो.
कंपनीबद्दल सांगायचे तर ही फार्मास्युटिकल आणि केमिकल इंडस्ड्रीसाठी इंजिनिअरिंग मशीन्सची निर्मिती करते. कंपनीचे हैदराबाद, तेलंगणा येथे 8 मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्स आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीने 549.68 कोटी रुपयांचा महसूल आणि 60.1 कोटी रुपयांचा कर भरल्यानंतरचा नफा (PAT) कमावला होता.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





