Stalin on the Modi Government: तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. स्टॅलिन यांनी भाषा मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना उघडपणे आव्हान देत तामिळनाडूमध्ये “त्रिभाषा धोरण” लागू करण्याची घोषणा करण्याचे धाडस त्यांच्यात आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. एका निवडणूक रॅलीदरम्यान स्टॅलिन यांनी आरोप करत, एनडीए सरकार दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे. “मी धर्मेंद्र प्रधान, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना उघडपणे आव्हान देतो. जेव्हा तुम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये येता, तेव्हा तामिळनाडूमध्ये त्रिभाषा धोरण लागू करणार असल्याचे सांगण्याचे धाडस तुमच्यात आहे का?” असा प्रश्न केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की, सीबीएसईच्या नवीन अभ्यासक्रमाच्या रचनेद्वारे हिंदी न बोलणाऱ्या राज्यांमध्ये हिंदीचा गुप्तपणे विस्तार केला जात आहे. , तामिळनाडू कोणत्याही परिस्थितीत भाषा लादण्याचे धोरण स्वीकारणार नाही. असे ठामपणे देखील त्यांनी म्हटले. Stalin on the Modi Government: स्टॅलिन यांनी दावा करत, केंद्र सरकारने ‘समग्र शिक्षा’ योजनेअंतर्गत तामिळनाडूसाठी असलेले २,२०० कोटी रुपये बेकायदेशीरपणे रोखून ठेवले आहेत.असा दावा त्यांनी केलाय.तसेच त्यांनी असा आरोप केला की, राज्याने हिंदी भाषा लादण्याच्या धोरणाला मंजुरी न दिल्यामुळे हा निधी रोखून ठेवण्यात आला आहे. “हे अनुदान नाही, तर करांमधून गोळा केलेला तामिळनाडूच्या जनतेचा पैसा आहे. याचा वापर जबरदस्तीचे शस्त्र म्हणून केला जाऊ शकत नाही.”असेही त्यांनी म्हटले. गॅस सिलिंडर आणि महागाईने घेरले Stalin on the Modi Government: वाढती महागाई आणि एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यावरून स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदींनी लोकांना स्वयंपाकाच्या गॅससाठी बराच वेळ थांबायला लावले आहे. स्टॅलिन म्हणाले, “लोक विचारत आहेत, ‘मोदीजी, एलपीजी कुठे आहे?’ पंतप्रधानांकडे याचे उत्तर आहे का? सिलिंडरच्या कमतरतेमुळे बंद पडलेल्या रेस्टॉरंटना ते काय उत्तर देणार?” त्यांनी एनडीएच्या ‘डबल इंजिन’ला ‘फेल इंजिन’ म्हटले आणि ते तामिळनाडूमध्ये येऊ नये असे सांगितले. धर्मेंद्र प्रधान यांचे प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्यांना पलटवार केला. त्यांनी, “मुख्यमंत्र्यांचा ‘लादण्याचा’ युक्तिवाद हा त्यांचे राजकीय अपयश लपवण्याचा प्रयत्न आहे.” प्रधान म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हा भाषिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा असून, त्यात मातृभाषेला प्राधान्य देण्यात आले आहे, जेणेकरून तमिळ मुले त्यांच्या स्वतःच्या भाषेत प्रावीण्य मिळवू शकतील. प्रधान म्हणाले की, बहुभाषिकतेला धोका मानणे चुकीचे आहे आणि इतर भाषा शिकल्याने तमिळ भाषा कमकुवत होत नाही, उलट ती अधिक मजबूत होते. एआयएडीएमकेवरही निशाणा Stalin on the Modi Government: निवडणूक रॅलीदरम्यान स्टॅलिन यांनी विरोधी पक्ष एआयएडीएमकेवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, एआयएडीएमकेने आपल्या दहा वर्षांच्या राजवटीत तमिळनाडूला खड्ड्यात ढकलले होते. या मुद्द्यांवर केंद्र सरकारविरोधात आवाज उठवण्याचे धाडस पलानीस्वामींमध्ये आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला.