ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
Updated On:

मुंबई – राज्यातील एसटी कर्मचारी संपावर असून विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. याबाबत सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी न्यायालयाने 22 मार्चपर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
त्रिसदस्यीस समितीने दिलेल्या एसटी विलीनीकरणाच्या अहवालावर न्यायालयात आज सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कोणत्याही एसटी कर्मचाऱ्यावर येत्या 22 मार्चपर्यंत कारवाई करु नये, असे आदेश राज्य सरकारला दिले. तसेच न्यायालयाने या प्रकरणातील पुढील सुनावणी 22 मार्च रोजी ठेवली असून या दिवशी राज्य सरकारला आपले मत शपथपत्राद्वारे मांडण्याचे आदेश दिले.





