शिरूर : नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या निकालात शिरूरच्या सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्ता आणि परिश्रमाचा ठसा उमटवत सलग सहाव्या वर्षी 100 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी एकूण 108 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि त्यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे संख्यात्मक निकालाबरोबरच गुणवत्तेच्या निकषावरही शाळेचा निकाल अत्यंत उल्लेखनीय ठरला आहे. शाळेचे दोन विद्यार्थी कु. प्रांजल खामकर आणि अनुभव जांग्रा यांनी थक्क करणारे 99 टक्के गुण मिळवत शाळेतीलच नव्हे तर तालुकास्तरावरही प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळा, पालक, शिक्षकवृंद आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे, समाधानाचे वातावरण पररले आहे. इतर गुणवंत विद्यार्थी : युगंधर शिंदे – 98.40 टक्के (द्वितीय क्रमांक), आदित्य लांडे – 97.40 टक्के (तृतीय क्रमांक), कृष्णा पडवळ – 97 टक्के, संस्कृती रंधे – 96 टक्के, ओम नेमाडे – 96.80 टक्के, श्रेया तायडे – 96.80 टक्के, अनुष्का शेवाळे – 96 टक्के, ओवी पाटील, अनुष्का शेळके – 96 टक्के, वैष्णवी अडसूळ – 95 टक्के, दिव्या दुगड – 95 टक्के, सोनल सातकर – 94.40 टक्के, आर्यन थोरात, ईश्वरी थोरात, लिकीशा सारडा – 94 टक्के, श्रद्धा अडसुरे – 93.40 टक्के, कौस्तुभ राक्षे, वर्षा हिंगणीकर, हर्षवर्धन शेळके – 93 टक्के, अजिंक्य दाते – 92.40 टक्के, आर्यन इंगळे, तनूजा भोसले – 92.20 टक्के, अथर्व ताडगे, आयुष उबाळे, श्रेया पाटील, ओम साळुंखे – 92 टक्के, झेबा अन्सारी – 91 टक्के, शाहीन करंजूले – 90.40 टक्के यावर्षी एकूण 30 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले असून 24 विद्यार्थ्यांनी 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवत शाळेच्या गुणवत्ता परंपरेला अनुसरून उज्ज्वल यश मिळवले आहे. या यशामागे शाळेच्या प्राचार्या नॅन्सी अनिल पायस, अध्यक्ष दादाभाऊ वाखारे, शाळेचे मार्गदर्शक सुनील भाकरे, सर्व शिक्षकवृंद आणि इतर कर्मचाऱ्यांचे परिश्रम व समर्पण आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य, पालकांचा विश्वास, आणि शाळेतील शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरण यामुळे हे नेत्रदीपक यश शक्य झाले. शिरूर तालुक्यात सेंट जोसेफ शाळेच्या गुणवत्तेची, शिस्तीची आणि निकालातील सातत्यपूर्ण यशाची स्तुती केली जात आहे. शाळेच्या या घवघवत्या यशामुळे भविष्यातील विद्यार्थ्यांसाठीही एक प्रेरणादायी वाट ठरली आहे.