पुणे-सातारा महामार्गावर एसटीची कंटेनरला जोरदार धडक; २ प्रवाशांचा जागीच मृत्यू

वरवे – सातारा महामार्गावर वरवे गावाच्या हद्दीत विचित्र अपघात झाल्याची घटना घडली, 4 वाहन एकमेकांना धडकल्यानं हा अपघात झाला आहे. वाहनांमध्ये 2 कंटेनर आणि 2 बसचा समावेश आहे. यात खाजगी बस पलटी झाल्यानं, 4 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले. यातील 4 जण गंभी असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास आले असून उपचार सुरू आहेत. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे – सातारा महामार्गावर वरवे गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा रस्त्यावरील वरवे गावच्या हद्दीत एसटी कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटीतील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला एका एसटी बसने मागून जोराची धडक दिली.
या धडकेत एसटी बस उलटली. बस उलटल्यामुळे बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, असून पाच जण गंभीर जखमी आहेत. तसेच यावेळी एक कार देखील कंटेनरला मागून धडकली. मात्र, कारमधील प्रवासी सुरक्षित आहेत. दरम्यान, सातारा रस्त्यावर या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू आहे रस्त्यावर या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताचे गंभीर स्वरूप पाहता अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.





