एसटीमध्येच बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या, लातूर हादरले!
Updated On:

उदगीर – संगमनेरमध्ये मध्ये बस चालकाच्या आत्महत्येची घटना ताजी असताना लातूर जिल्ह्यातील उदगीर आगारामध्ये बस चालकाने आत्महत्या केली आहे. या एसटी बस चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बस चालकाच्या आत्महत्येच्या पुनरावृत्ते परिवहन विभाग पुन्हा हादरले आहे.
संजय रामराव केसगिरे, वय ४७ असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. उदगीर आगारातील बसमध्ये )MH 20 B.L 2160) गळफास घेतल्याचे आढळून आले आहे.





