सोलापूर – सोलापुरमध्ये २५ प्रवाशांना घेऊन जाणा-या एसटीचा अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने एसटीने डिव्हायडरवर तोडून कारला धडक दिली. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. बार्शीतून सोलापूरकडे एक एसटी बस येत होती. या एसटीमध्ये एकूण २५ प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर जवळील बाळे परिसरातील संतोष नगर जवळ बस येताच बसचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे एसटी डिव्हायडरवर चढून कारला धडकली. एसटीतील प्रवशांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली.