SSC-HSC Result: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्सुकता आता संपणार असून, बारावीचा निकाल पुढील आठवड्यात ५ किंवा ७ मे रोजी लागण्याची दाट शक्यता आहे. बारावीच्या निकालानंतर अवघ्या आठवडाभरात म्हणजेच १५ मे पूर्वी दहावीचा निकालही घोषित केला जाण्याची शक्यता मंडळाच्या वरिष्ठ सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यात १७ मे पासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने, त्यापूर्वी हे निकाल लावण्याचे नियोजन शिक्षण मंडळाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. SSC-HSC Result यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेसाठी बारावीतून ३७ हजार ३३८, तर दहावीतून ३२ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बोर्डाच्या नियोजनानुसार बारावीचा निकाल एप्रिलअखेर लागणे अपेक्षित होते, मात्र कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे निकालाची ही प्रक्रिया आठवडाभर लांबणीवर पडली आहे. (SSC-HSC Result) SSC-HSC Result: 12वीचा निकाल पुढील आठवड्यात, तर 10वीचा निकाल 15 मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी आणि पुढील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक कोलमडू नये, यासाठी यंदा परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या. मात्र, उत्तरपत्रिका तपासणीनंतरची संगणकीय प्रक्रिया आणि अहवाल तयार करण्याचे काम कर्मचारी संपामुळे काही काळ रखडले आहे. (SSC-HSC Result) निकालाला विलंब होण्याचे मुख्य कारण कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप हेच असल्याचे स्पष्ट होत आहे. विभागीय मंडळाचे सहाय्यक सचिव दीपक कोकतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण झाले होते. मात्र, त्यानंतरची तांत्रिक तपासणी आणि निकालाचा अंतिम गोषवारा तयार करण्याची प्रक्रिया सध्या प्रलंबित आहे. SSC-HSC Result पुढील दोन-तीन दिवसांत निकालाची सर्व तयारी पूर्ण होण्याची चिन्हे असून, त्यानंतर अधिकृतरीत्या निकालाची तारीख जाहीर केली जाईल. निकाल लवकर लागल्यास १७ मे पासून सुरू होणाऱ्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला मोठा दिलासा मिळणार आहे. SSC-HSC Result