SRPF Exam Cancelled : राज्य राखीव पोलीस दलाची (SRPF) गट क्रमांक 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातून जसेच्या तसे आल्याचा आरोप झाल्यानंतर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. (SRPF Exam Cancelled) मिळालेल्या माहितीनुसार, आता ही परीक्षा 24 मे 2026 रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. पुनर्परीक्षा स्वामी चिंचोळी, दौंड येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे. (SRPF Exam Cancelled) 85 प्रश्न खासगी पुस्तकातून आल्याचा आरोप 2 मे 2026 रोजी झालेल्या लेखी परीक्षेतील प्रश्न हे एका खासगी प्रकाशकाच्या ‘पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच 10’ या पुस्तकातून घेतल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला होता. या पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न प्रश्नपत्रिकेत जसेच्या तसे आल्याचं समोर आल्यानंतर भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. विरोधी पक्षांकडूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. (SRPF Exam Cancelled) चौकशीचे आदेश, भरती प्रक्रिया स्थगित या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र पोलीसच्या राज्य राखीव पोलीस बल विभागाने 4 मे रोजी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. (SRPF Exam Cancelled) यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी संबंधित परीक्षा अधिकृतपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उमेदवारांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. 24 मे रोजी पुनर्परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार, SRPF गट 5 दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची पुनर्परीक्षा 24 मे 2026 रोजी स्वामी चिंचोळी येथे होणार आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना न्याय मिळेल आणि भरती प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (SRPF Exam Cancelled) दरम्यान, SRPF प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात माध्यमांमधून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतल्याचं नमूद केलं असून चौकशी अहवालानंतर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. (SRPF Exam Cancelled)