JK Election Result: मेहबूबा मुफ्ती यांनी NC-काँग्रेसचे विजयाबद्दल केले अभिनंदन, केंद्र सरकारवर साधला निशाणा

जम्मू – जम्मू आणि काश्मीरमधील आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार (Jammu Kashmir Election Result), एनसी आणि काँग्रेस यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळत आहे. निकालादरम्यान, पीडीपी सुप्रीमो आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा यांनी विजयाबद्दल नॅशनल कॉन्फरन्सच्या (एनसी) नेतृत्वाचे अभिनंदन केले.
मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, त्यांचा पक्ष विधायक विरोधी पक्षाची भूमिका बजावेल. त्या म्हणाल्या की, नेत्रदीपक विजयासाठी मी एनसी नेतृत्वाचे अभिनंदन करते. स्थिर सरकारसाठी मतदान केल्याबद्दल मी जम्मू-काश्मीरच्या जनतेचेही अभिनंदन करू इच्छिते.
केंद्र सरकारवर साधला निशाणा –
निकालानंतर मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निर्णायक निकालापासून धडा घेतला पाहिजे आणि आगामी नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस सरकारच्या कारभारात हस्तक्षेप केला नाही पाहिजे, असे म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, उमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे पुढचे मुख्यमंत्री असतील. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये एनसी आणि काँग्रेस आघाडीला पूर्ण बहुमत मिळत आहे.
पीडीपी कार्यकर्त्यांना आवाहन –
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, मी पीडीपी कार्यकर्त्यांना सांगेन की चढ-उतार येत असतात मात्र हिंमत हरली नाही पाहिजे. काश्मीरमधील लोकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी एक मजबूत सरकार बनवणे आवश्यक आहे.





