निमोणे : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या विद्यमाने महर्षी शिंदे विद्यालय आंबळे आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेच्या मल्लांनी निर्विवाद घवघवीत यश मिळवले असुन तब्बल सहा मल्लांची शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असुन तीन मल्लांनी द्वितीय क्रमांक तर चार मल्लांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.
१) पै शिवम जगताप-सुवर्णपदक(१४ आणि ३८ किलो)
२) पै आयान मुलानी-सुवर्णपदक (१४ आणि ४८ किलो)
३) पै अभिराज जगताप -सुवर्णपदक (१४ आणि ५२ किलो)
४) पै प्रणव गवळी-सुवर्णपदक (१७ आणि ८० किलो)
५) पै किरण कांबळे-सुवर्णपदक (१७ वर्षाखालील ८६ किलो गट)
६) पै गणेश चौगुले -सुवर्णपदक(१९ वर्षाखालील ११० किलो )
७) पै साहिल शितोळे (१४ आणि ४५ किलो)
८) पै उदय जगताप (१४ आणि ४८ किलो)
९) पै गणेश कोळपे (१७ आणि ५५ किलो)
१०) पै अविष्कार फराटे (१४ आणि ४५ किलो)
११) पै यश भडांगे (१४ आणि ३५किलो)
१२) पै हर्षद पवार (१७ आणि ४५ किलो)
१३) पै श्रीराम शिंदे(१७ आणि ६० किलो )
या सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख बी पी येवले, क्रिडा स्पर्धा प्रमुख प्रशांत वाळुंज, क्रिडा शिक्षक विजय कराळे, मिलिंद निंबाळकर, नितीन गवळी, गोरक्ष वेताळ, दिलीप वराळे, सारंग फराटे, संतोष परदेशी, हर्षल शेंडे, तसेच कुस्ती मार्गदर्शक राजेंद्र कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले. शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी सचिव नंदकुमार निकम, संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश बाफना, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुरेश ढमढेरे, उपाध्यक्ष बालाजी कांबळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सचिन फराटे, मुख्याध्यापक रामदास चव्हाण, उपमुख्याध्यापक गणपत बोत्रे, पर्यवेक्षिका संपदा वेताळ तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सर्व मल्लांचे कौतुक करुन पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.