Sri Lanka : श्रीलंकेतील पोलिसांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक

कोलंबो : श्रीलंकेतील पोलीस दलाचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. सोशल मीडियाव्यतिरिक्त सरकारी प्रिंटींग डिपार्टमेंटची वेबसाईट देखील हॅक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आमच्या यूट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिक-टॉक आणि एक्सच्या अकाऊंटला सायबर हल्ल्याचा फटका बसला, असे पोलीस दलाचे प्रवक्ते आणि अधिक्षक के.बी. मनाथुंगा यांनी सांगितले. हॅकिंग करणाऱ्यांना ओळखले गेले असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या सोशल मीडिया खात्यांसोबतच सरकारच्या प्रिंटर विभागाची अधिकृत वेबसाइटही हॅक करण्यात आली. या वेबसाइटवर महत्त्वाच्या घोषणांसह सर्व सरकारी प्रकाशने प्रकाशित केली जातात, त्या वेबसाइटलाही हॅक केले गेले आहे. या सायबर हल्ल्यामागील गट अद्याप ओळखला जाऊ शकलेला नाही, असे कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम या सरकारी एजन्सीने म्हटले आहे.
आम्ही सुरक्षितपणे म्हणू शकतो की वेबसाइट डेटाशी तडजोड केली गेली नव्हती, सायबर हल्ला करणाऱ्यांनी फक्त काही डाटा अपलोड केला आहे, असे सीईआरटीचे प्रवक्ते निरोशन आनंदा यांनी पत्रकारांना सांगितले.





