#Cricket : श्रीलंकेच्या पत्रकाराची कोहलीवर टीका
Updated On:

नवी दिल्ली : न्यूझीलंडचा केन विल्यमसन, आॅस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ व पाकिस्तानचा बाबर आझम जास्त गुणवान असूनही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला विनाकारण अवाजवी महत्व कशासाठी देता अशी विचारणा श्रीलंकेचा मुक्त पत्रकार डॅनिअल अलेक्झांडरने केली आहे.
https://twitter.com/daniel86cricket/status/1231450613021581313?s=19
न्यूझीलंड दौ-यावर भारतीय संघाने टी-२० मालिका ५-० अशी जिंकली. त्यानंतर मात्र संघाला एकदिवसीय मालिकेत अपयश आले. कसोटी मालिकेतही पहिला सामना गमवावा लागला.
या सामन्यांत कोहलीचे अपयश ठळकपणे उठून दिसले. बाबर, स्मिथ व विल्यमसन हे कोहलीपेक्षाही जास्त सरस कामगिरी करताना दिसतात. मग कोहलीला अवाजवी महत्व का दिले जात आहे, असेही डॅनिअलने स्पष्ट केले आहे.





