श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : तीन भारतीयांचा मृत्यू

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये आज साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली. या बॉम्बस्फोटामध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी या तिघा भारतीयांची नावे आहेत.
Indian High Commission in Colombo has conveyed that National Hospital has informed them about the death of three Indian nationals. Their names are Lokashini, Narayan Chandrashekhar and Ramesh. We are ascertaining further details. /3
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 21, 2019
आज जगभरामध्ये ईस्टर संडे साजरा केला जात असून, श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये देखील ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे.
बॉम्बस्फोटांच्या मालिकेमध्ये आतापर्यंत २०७ हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावलेे असल्याची माहिती मिळाली असून, ४५० हून अधिक लोक या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसल्याने या बॉम्बस्फोटांमागे नक्की कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. मात्र ७ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
या स्फोटात आतापर्यंत तीन भारतीयांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली असल्याचे सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. भारतीय उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश या तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तर अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे सुषमा स्वराज यांनी म्हंटले आहे.
आणखी संबंधित बातम्या
Shiranthi Rajapaksa : श्रीलंकेच्या माजी फर्स्ट लेडी शिरांथी राजपक्षे यांना अटक

Basil Rajapaksa : बसिल राजपक्षेंविरोधात इंटरपोलची मदत घेणार; श्रीलंकेच्या पोलिसांची माहिती

Namal Rajapaksa : नमल राजपक्षे यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक

Womens Champions Trophy : आयसीसीचा श्रीलंकेला मोठा दणका! चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हिरावले, स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की

IND vs SL Test : यशस्वी-फर्नांडोनंतर 'या' खेळाडूवर ICCची मोठी कारवाई; 'ती' चूक पडली महागात

