SL vs NZ 2nd ODI : श्रीलंकेचा 12 वर्षांनी न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय, दुसऱ्या सामन्यात 3 विकेट्सने केली मात…

Sri Lanka vs New Zealand 2nd ODI : श्रीलंका क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना 17 नोव्हेंबर रोजी पार पडला. उभयसंघात पावसामुळे हा सामना 47 षटकांचा खेळवण्यात आला. नुकतेच भारताचा पराभव करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेसमोर नमते घ्यावे लागले. या मालिकेत श्रीलंकेने सलग दुसरा सामना जिंकला आणि 2-0 अशी अजेय आघाडी घेतली. श्रीलंकेने 12 वर्षांनतंर न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याचा कारनामा केला. आता मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा मंगळवारी 19 नोव्हेंबरला दुपारी 2.30 वाजता पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यात श्रीलंका न्यूझीलंडला क्लीन स्वीप देणार की न्यूझीलंड अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा राखणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
श्रीलंकेची अपराजित मोहीम सुरूच….
या मालिका विजयासह श्रीलंकेने घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत आपली अपराजित मोहीम सुरू ठेवली आहे. घरच्या मैदानावर संघाचा हा सलग सहावा एकदिवसीय मालिका विजय आहे. श्रीलंकेने प्रथमच सलग 6 मालिका जिंकल्या आहेत, याआधी त्यांनी 1997 ते 2003 दरम्यान सलग पाच एकदिवसीय मालिका जिंकली होती. 2014 नंतर श्रीलंकेने एका कॅलेंडर वर्षात पाच द्विपक्षीय मालिका जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. तसेच महत्वाचे म्हणजे साल 2012 नंतर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, 2021 सालानंतरची ही 10वी एकदिवसीय मालिका आहे जिथे श्रीलंका अपराजित राहिला आहे.
असा झाला सामना…
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 45.1 षटकात 209 धावा केल्या होत्या. यादरम्यान चॅपमनने 81 चेंडूत 76 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन षटकार आणि सात चौकार लगावले. त्याच्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज ‘मिच हे’ याने 62 चेंडूत 49 धावांची शानदार खेळी केली. तर सलामीवीर विल यंगने 40 चेंडूत 26 धावांचे तर ग्लेन फिलिप्स याने 15 धावांचे योगदान दिले. या चौघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठला आला नाही त्यामुळे न्यूझीलंडला कशीतरी 200 पार मजल मारता आली. श्रीलंकेकडून गोलंदाजीत महिष तीक्षणाने 9.1 षटकात 31 धावा देत 3 बळी घेतले, तर जेफ्री वांडरसेनेही 10 षटकात 46 धावा देताना 3 गडी बाद केले. याशिवाय असिथा फर्नांडो याने दोघांना बाद केलं. तर दुनिथ वेल्लालागे आणि कॅप्टन चरिथ असलंका या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.
2-0 lead and it is Sri Lanka’s first ODI series win over NZ since 2012 👏
It was an old-school ODI classic
🔗 https://t.co/35mQb7QYsH | #SLvNZ pic.twitter.com/dpJG5VOt1Y
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 17, 2024
विजयासाठी 210 धावांचे लक्ष श्रीलंकेने 1 षटक आणि 3 गडी शिल्लक राखून गाठले. यादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने 102 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीनं नाबाद 74 धावांची तर महेश तीक्षणा याने 44 चेंडूत 2 चौकार अन् 1 षटकारासह नाबाद 27 धावांची खेळी करत संघाचा विजय साकारला तर इतरांमध्ये सलामीवीर पथुम निसांका (28), जेनिथ लियानागे(22), दुनिथ वेललागे (18), कर्णधार चारिथ असलंका (13) यांनी छोटेखानी खेळी करत विजयात हातभार लावला. श्रीलंकेच्या संपूर्ण डावात महेश तीक्षणाच्या बॅटमधून केवळ एक षटकार मारला गेला. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत मायकल ब्रेसवेल याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन मिचेल सँटनर,ग्लेन फिलिप्स आणि नॅथन फिलिप्स या तिघांनी प्रत्येकी 1-1 बळी मिळवला.
Border-Gavaskar Trophy 2024/25 : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत चेतेश्वर पुजारा दिसणार एका नव्या भूमिकेत…
जयसूर्याच्या आगमनानंतर श्रीलंकेचा झाला कायापालट….
सनथ जयसूर्या संघाचा प्रशिक्षक झाल्यापासून श्रीलंकेने सात मालिका जिंकल्या आहेत. श्रीलंकेने भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली. इंग्लंड आणि न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत केले. वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका जिंकली. न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका ड्रॉ केली आणि एकदिवसीय मालिकेत पराभूत केलं.


