World Test Championship WTC Points Table 2023-25 : चेन्नई येथे बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करून भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) 2025 सायकलच्या अव्वल स्थानावर आपली पकड मजबूत केली आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून, तिथे दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने मोठा उलटफेर केला आणि न्यूझीलंडचा 63 धावांनी पराभव केला. या विजयासह यजमान श्रीलंकेने मालिकेत 1-0अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेचा विजय आणि न्यूझीलंडच्या पराभवानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे पॉइंट टेबलचे समीकरणही बदलताना दिसत आहे. गॅलेमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून श्रीलंकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या संधी वाढवल्या आहेत. पुढच्या वर्षी लॉर्ड्सवर होणाऱ्या WTC फायनलमध्ये शेवटच्या दोन स्थानांच्या शर्यतीत भारत आणि श्रीलंकेच्या कसोटी सामना जिंकत संघांनी महत्त्वाचे गुण मिळवले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर, श्रीलंकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या गुणतालिकेत बरीच मजल मारली आहे. श्रीलंकेने आता न्यूझीलंडला मागे टाकले आहे. 8 सामन्यात 4 विजय आणि 4 पराभवानंतर श्रीलंकेचे 48 गुण झाले असून ऑस्ट्रेलियानंतर संघ आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाची गुणतालिकेत एका स्थानानं घसरण झाली आहे. श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. किवी संघाचे 7 सामन्यात 3 विजय आणि 4 पराभवानंतर 36 गुण आहेत. किवी संघ आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघ अजूनही पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशविरूध्दच्या पहिल्या कसोटीतील भारताच्या विजयाने संघाचे गुणतालिकेतील स्थान भक्कम झाले आहे. भारताच्या गुणांची टक्केवारी (पीसीटी) 71.67 झाली आहे. त्याचवेळी बांगलादेशच्या पराभवामुळे ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर ढकलले गेले आहेत. ते 39.29% गुणांची टक्केवारी (PCT) सह श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या मागे आहेत. धनंजय डी सिल्वाचा संघ आता 50 टक्के गुणांसह भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. IND vs BAN 2nd Test : 2-0 ने मालिका विजय निश्चित? कानपूरमध्ये भारताचं रेकॉर्ड पाहता सामन्यापूर्वीच बांगलादेशच्या संघाचं खचणार मनोबल…. श्रीलंकेच्या विजयामुळे अंतिम फेरी गाठण्याच्या दावेदारांमध्ये त्यांचे स्थान निश्चित झाले आहे. आता ते जास्तीत जास्त 69.23% गुण गाठू शकतात. अशा स्थितीत त्याची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता कायम आहे. यासाठी न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकण्याबरोबरच लंकन संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिकाही क्लीन स्वीप करावी लागणार आहे. आफ्रिकन संघाविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकेत होणार आहेत.