Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ‘या’ दिग्गज क्रिकेटरने केली तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटर ऋद्धिमान साहाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर आता श्रीलंकेचा स्टार क्रिकेटर दिमुथ करुणारत्ने याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो त्याचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार शेवटचा सामना
सध्या श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. या सीरिजचा पहिला टेस्ट सामना 29 जानेवारी पासून सुरु झाला होता. यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा एक डाव आणि 242 धावांनी पराभव केला. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा आणि शेवटचा सामना हा 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.
🚨 DIMUTH KARUNARATNE RETIRING FROM CRICKET 🚨
– Karunaratne will be playing his 100th Test against Australia during the 2nd Test and he will be retiring from International cricket after the match. [Sportspavilion] pic.twitter.com/n3gt91FLx6
— Johns. (@CricCrazyJohns) February 4, 2025
श्रीलंकेत होणारा हा टेस्ट सामना दिमुथ करुणारत्ने त्याच्याकरता अतिशय खास असून हा त्याचा 100 वा टेस्ट सामना असणार आहे. 100 वा टेस्ट सामना खेळून दिमुथ करुणारत्ने हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. दिमुथ करुणारत्ने हा श्रीलंकेच्या टेस्ट आणि वनडे संघाचा माजी कर्णधार राहिला होता.
दिमुथ करुणारत्ने याची कारकीर्द
दिमुथ करुणारत्ने याच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर 2012 मध्ये दिमुथ करुणारत्नेने न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर 2011 मध्ये इंग्लंड विरुद्ध त्याने वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. तो श्रीलंकेकडून क्रिकेटच्या वनडे आणि टेस्ट अशा दोनच फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने 99 टेस्टमध्ये 7172 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 द्विशतक, 16 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याने श्रीलंकेकडून 50 वनडे सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 1316 धावा केल्या आहेत. यात त्याने 1 शतक आणि 11 अर्धशतक केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधून श्रीलंका आउट
श्रीलंका क्रिकेट संघ हा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी क्वालिफाय करू शकला नाही. त्यामुळे यंदाच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये श्रीलंकेचा समावेश नसणार आहे. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीची लढत 8 संघांमध्ये होणार असून यात ग्रुप ए मध्ये पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश तर ग्रुप बी मध्ये दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड यांचा समावेश असणार आहे.





