पुसेगाव, (प्रतिनिधी)- श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील श्री हनुमानगिरी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत यशाची गौरवशाली परंपरा कायम राखली. गुणवत्तेबरोबर संस्कार जपणाऱ्या या शाळेचा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राचा विशेष दबदबा आहे. विदयालयाचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. पाचवी- चैतन्य अबदागिरे, जान्हवी गायकवाड, आर्य कर्णे. यापैकी जान्हवी गायकवाड सैनिक स्कूल प्रवेशासही पात्र ठरली आहे. आठवी- भक्ती ठोंबरे, प्रीती फडतरे, सांची मसणे, ओम सावंत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव मोहनराव जाधव, सर्व पदाधिकारी तसेच गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे के. डी. पवार, डी. पी. शिंदे, एस. आर. पाटील, जयंतराव जाधव, प्राचार्य डी .एन. गोफणे, पर्यवेक्षक आर. एन. जाधव, व्होकेशनल विभाग प्रमुख जे. बी. जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थांनी सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.