satara | श्री हनुमानगिरी हायस्कूल गुरुकूल सेमी इंग्रजी विभागाचा १०० टक्के निकाल

पुसेगाव, (प्रतिनिधी) – येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूलने गुरुकूल सेमी इंग्रजी विभागाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. हायस्कूलमध्येअनुजा उमेश जाधव 97.80 टक्के (प्रथम) , मानसी मनोज चव्हाण 96.80 (द्वितीय), स्वरांजली प्रदीप गुरव 95.40 (तृतीय) यांनी यश मिळवले.
गुणवत्तेबरोबर संस्कार जपणाऱ्या या शाळेतील विदयार्थी नेहमीच सर्वच परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवत असतात. इयत्ता ५वी , ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, एन. एम .एम. एस . परीक्षा, नवोदय, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत अनेक विदयार्थी चमकले आहेत. क्रीडा क्षेत्रात देखील या शाळेचा दबदबा आहे. तालुक्यात तंत्रशिक्षण देणारी ही एकमेव शाळा आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव , उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव मोहनराव जाधव, खजिनदार लक्ष्मणराव जाधव, के .डी. पवार, डी. पी. शिंदे, एस. आर. पाटील, जयंतराव जाधव, प्राचार्य डी. एन. गोफणे, पर्यवेक्षक आर. एन .जाधव, प्रा. जे. बी .जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.





