\n\nInnings Break!
\nFifties for Abhishek Sharma and Heinrich Klaasen 🤝
\n3⃣ wickets each for Jamie Overton and Anshul Kamboj 👌#CSK‘s chase coming up! ⌛️
\nScorecard ▶️ https://t.co/uJG04r8iXD #TATAIPL | #KhelBindaas | #SRHvCSK pic.twitter.com/syNHwekrza
\n— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026
\nनाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या हैदराबादला अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ५.५ षटकांत ७५ धावांची सलामी दिली. अभिषेक शर्माने केवळ १५ चेंडूत अर्धशतक ठोकत वादळ निर्माण केले. त्याने २२ चेंडूत ५९ धावा कुटल्या. हेडने २३ धावा केल्या, तर कर्णधार इशान किशन शून्यावर बाद झाला. मधल्या फळीत हेनरिक क्लासेनने जबाबदारीने खेळत ३९ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. चेन्नईकडून अंशुल कंबोज आणि जेमी ओवरटन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
\n\nTravis Head ✅
\n
\nIshan Kishan ✅Mukesh Choudhary announces his arrival in #TATAIPL 2026 with two big wickets 👏
\nUpdates ▶️ https://t.co/uJG04r7L85 #KhelBindaas | #SRHvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/UC7Dc2nMOj
\n— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026
\nप्रत्युत्तरात १९५ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना संजू सॅमसनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून इरादे स्पष्ट केले होते, पण तो ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड (१९) आणि आयुष म्हात्रे (३०) यांनी वेगाने धावा जमवल्या. मधल्या फळीत सर्फराझ खानने २५ आणि शिवम दुबेने २१ धावा करत विजयाचा प्रयत्न केला, पण हैदराबादच्या इशान मलिंगाने ३ विकेट्स घेत चेन्नईच्या फलंदाजीची कंबर मोडली. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची गरज होती, मात्र हैदराबादच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांना हार मानावी लागली.