पिंपरी | एसआरए पुनर्वसनधारकांना मिळाली पक्की घरे

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरीगावातील गणेशनगर एसआरए पुनर्वसनधारकांना आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते सदनिकांची चावी लाभार्थ्यांना देण्यात आली. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती डब्बू आसवानी, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, प्रभाकर वाघेरे, दत्ता वाघेरे, गिरीजादेवी कुदळे, निकिता कदम, ॲड. गोरक्ष लोखंडे, स्मिता लोंढे,
संतोष कुदळे, बाळा वाघेरे, रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, श्रीरंग शिंदे, आनंदराव कुदळे, शारदा मुंढे, राजू भालेराव, सिद्धार्थ पुजारी, राजेश धोत्रे, दशरथ मंजाळ, सौरव विधाटे, संतोष पवार, चरणदास वाघमारे, अंथनी जोशफ, राहूल शिरसाट, सागर संधू, शुभम खेरटकर, कपील लोंढे, राणी विधाटे, अनिता वाघमारे, सुनिता विश्वकर्मा, सीमा सावंत आदी उपस्थित होते.
एसआरए पुनर्वसन पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. यामुळे गोर गरीब झोपडीधारकांना स्वतःच्या हक्काची पक्की घरे मिळात आहेत, हे पाहून आनंद होत आहे, अशी भावना आमदार बनसोडे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेश लोंढे यांनी केले. आभार सिद्धाप्पा पुजारी यांनी मानले.





