Pune District | कांदा पिकात तणनाशक औषध फवारणी सुरू
Updated On:

चिंबळी,- गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी रब्बी हंगामातील लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला थंड वातावरणाचा गारवा पोषक ठरत असल्याने कांदा पिक हिरवेगार झाले आहे. मात्र, त्यात गवताचे तण मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
या परिसरात औद्योगिक क्षेत्रात वाढ झाली असल्याने खुरपणीसाठी शेतमजुरांची टचाई जाणवत आहे. त्यामुळे गवताचे तण नष्ट करण्यासाठी स्वत:च शेतकऱ्याला तणनाशक औषधाची फवारणी करावी लागत आहे.
चिंबळी : मरकळ (ता. खेड) परिसरातील शेतात रब्बी हंगामातील अनुकूल वातावरणामुळे कांदा की हिरवेगार झाले आहे. यात वाढलेल्या तणाचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तणनाशक ओषध फवारणी सुरू केली आहे.





