मुंबई : टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकणाऱ्या एका फलंदाजाने अवघ्या २९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. त्याच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. फक्त क्रिकेट खेळायचं म्हणून सर्वकाही सोडणाऱ्या या खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केल्याने क्रीडा विश्वात मोठी मोठी खळबळ उडाली आहे. कोण आहे हा खेळाडू ? हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून वेस्ट इंडिजचा स्टार प्लेयर निकोलस पूरन आहे. त्याने 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून आपल्या रिटार्यडमेंटची घोषणा केली. हा निर्णय खूप कठीण होता, पण खूप विचार करून घेतल्याचं त्यानं सांगितलं. यामुळे पुन्हा एकदा वेस्ट इंडिजचा संघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. पूरनने आपल्या पोस्टमध्ये काय म्हंटले? आपल्याला आवडणाऱ्या या खेळाने खूप काही दिले आहे आणि देत राहील – आनंद, उद्देश, अविस्मरणीय आठवणी आणि वेस्ट इंडिजच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी. त्या लाल रंगाच्या रंगाचे कपडे घालणे, राष्ट्रगीतासाठी उभे राहणे आणि प्रत्येक वेळी मैदानावर पाऊल ठेवताना माझ्याकडे असलेले सर्व काही देणे… याचा माझ्यासाठी खरोखर काय अर्थ आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे. कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणे हा एक भाग्य आहे जो मी नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ ठेवेन. Nicholas Pooran retires from international cricket. We warned people it was coming. Never a dull day! pic.twitter.com/TiIndrFdt9 — Caribbean Cricket Podcast (@CaribCricket) June 9, 2025 चाहत्यांसाठी – तुमच्या अढळ प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्ही कठीण क्षणांमध्ये मला उचलले आणि अतुलनीय उत्कटतेने चांगल्या गोष्टी साजऱ्या केल्याबद्दल, माझे कुटुंब, मित्र आणि सहकारी – माझ्यासोबत या प्रवासात चालल्याबद्दल धन्यवाद. तुमचा विश्वास आणि पाठिंब्याने मला या सर्वांमधून नेलं. माझ्या कारकिर्दीचा हा आंतरराष्ट्रीय अध्याय संपत असला तरी, वेस्ट इंडिज क्रिकेटवरील माझे प्रेम कधीही कमी होणार नाही. मी संघ आणि प्रदेशाला पुढील वाटचालीसाठी यश आणि शक्तीशिवाय काहीही देऊ इच्छितो असे निकलोस पूरनने म्हंटले आहे. पूरनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द पूरनने वेस्ट इंडीजसाठी 61 वनडे आणि 106 टी20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. तो वेस्ट इंडीजसाठी टी20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये सर्वाधिक रन आणि सिक्स मारणारा खेळाडू आहे. पुढील टी20 वर्ल्ड कपला फक्त 8 महिने बाकी असताना पूरनने घेलेल्या या निर्णयामुळे वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का बसला आहे. या निवृत्तीमुळे पूरन आता जगभरातील टी20 लीग मॅच खेळण्यावर लक्ष केंद्रित करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल 2025 मध्ये त्याने लखनऊ सुपर जायंट्ससाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती.